Admin
बातम्या
गळ्यात कांद्याच्या आणि कापसाच्या माळा घालत विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे कांदे - कापूस आंदोलन
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून कांद्यासंदर्भात आंदोलन सुरु आहे. कांदा आणि कापूस दरांवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. डोक्यावर कांदे घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.
सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त... शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो... कांद्याला भाव मिळालाच पाहिजे... कापसाला भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुरुवातीलाच विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला
राज्यातील कांदा उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळत नसल्याने अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी कांदा आणि कापसाच्या माळा घालून राष्ट्रवादी आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत जोरदार घोषणाबाजी केली.