Budget Session VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री पुढे सरसावले
Admin

Budget Session VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री पुढे सरसावले

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून कांद्यासंदर्भात आंदोलन सुरु आहे. कांदा प्रश्नावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

या प्रश्नावर बोलण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहिले असता. विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री उठले आणि त्यांनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री पुढे झालेले दिसून आले. उपमुख्यमंत्र्यांनी लगेच उभे राहून विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री म्हणाले की, कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नसून सरकार कांदा आणि कापूस उत्पादकांच्या पाठिशी आहे. सरकार कांदा उत्पादकांना आवश्यक ती मदत करेल. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com