ताज्या बातम्या
अर्थसंकल्पानंतर आज अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता
राज्याचा अर्थसंकल्प काल अजित पवारांनी विधानसभेत सादर केला.
राज्याचा अर्थसंकल्प काल अजित पवारांनी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पानंतर आज अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लाडकी बहिणवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. निवडणूक काळात 2100 रुपयांची घोषणा केली होती मात्र या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केलीच नाही.
विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येण्याची शक्यता असून यासोबतच आज बनावट पनीरसंदर्भातही महत्त्वाची लक्षवेधी मांडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.