ताज्या बातम्या
Cabinet Expansion: अखेर शिंदे आणि फडणवीसांच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला
20 ते 30 जून 2022 या काळात महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय नाट्य घडलं.
20 ते 30 जून 2022 या काळात महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय नाट्य घडलं. 29 जून रोजी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
अखेर मंत्रीमंडळाला मुहूर्त मिळाला असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल रात्री उशिरा नवी दिल्लीत बैठक झाली. शिंदे फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील दोन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांची मंत्रिपदं धोक्यात येण्याची शक्यता आहे. तसेच शिंदेच्या वाट्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद येणार असल्याचे म्हटले जात आहे.