Maharashtra Day : महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ध्वजवंदना

राज्यभर आज महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवून राज्याच्या अभिमानास्पद इतिहासास अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. महाराष्ट्र पोलीस दलाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर उपस्थित होते. फडणवीस यांनी समाजमाध्यमांद्वारे महाराष्ट्रवासीयांना शुभेच्छा देत "जय महाराष्ट्र!" असा प्रेरणादायी संदेश दिला.राज्यभर आज महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शहीदांच्या स्मृतींचे जतन करत पुढील वाटचालीचा संकल्प करणारा हा दिवस राज्याच्या गौरवाचे प्रतीक ठरला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com