Eknath Shinde Latest News
Eknath ShindeLokshahi

वरळी हिट अँड रन प्रकरणावर CM एकनाथ शिंदेंच मोठं विधान; म्हणाले, "बार, पब्जमध्ये ड्रग्जसारखे अनैतिक व्यवहार..."

"विरोधक नेहमीच आरोप करत असतात. त्यांच्याकडे आरोप करण्यापलीकडे दुसरं काही काम नाही. आम्ही सकारात्मक पद्धतीने काम करत आहोत"
Published by :
Naresh Shende
Published on

Eknath Shinde Press Conference : विरोधक नेहमीच आरोप करत असतात. त्यांच्याकडे आरोप करण्यापलीकडे दुसरं काही काम नाही. आम्ही सकारात्मक पद्धतीने काम करत आहोत. मुंबईत किती मोठे प्रकल्प सुरु आहेत, लोक पाहत आहेत. मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, कारशेड असेल, हे सर्व आम्ही करत आहोत. हे विरोधकांना दिसत नाही. वरळी हिट अँड रन प्रकरणात मी पहिल्या दिवसापासून सूचना दिल्या आहेत. मी पोलीस आयुक्तांनाही सांगितलं आहे की , यामध्ये कुणाही असो, कायद्यासमोर सर्व सारखे आहेत. कायद्यासमोर कुणीही लहान-मोठा नसतो. हिट अँड रनमध्ये जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. बार, पब्जमध्ये ड्रग्जसारखे अनैतिक व्यवहार करणाऱ्यावंरही कठोर कारवाई करण्याचे आदेश मी दिले आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राजेश शहाला तुमच्या पक्षातून काढण्यात आलं, त्यांना पक्षातून काढण्यासाठी चार दिवस का लागले? एव्हढ्या दिवसांपासून केस सुरु आहे, त्यांचं नावही समोर आलं होतं, यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. जे पीडित आहेत, त्यांना सपोर्ट करणं, ही प्राथमिकता आहे का? याला प्रधान्य द्यायचं की राजकारण करायचं? मला एव्हढच म्हणेत कोणत्याही केसमध्ये सरकारकडून कुणालाही सपोर्ट केलं जाणार नाही. कुणालाही मदत केली जाणार नाही.

वरळी सी-लिंकला जोडणारा रस्ता दोन-तीन आठवण्यात पूर्ण होईल. कोस्टल रोड सी-लिंकला जोडला गेल्यानं वाहतुकीच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे. एक-एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर तो उद्घटनासाठी न थांबवता लोकांसाठी खुला करत आहोत. त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल. रेस कोर्सचं १२० एकरचं मुंबई सेंट्रल पार्क आंतरराष्ट्रीय दर्जाचं करत आहोत.

हे देखील सबवेच्या माध्यमातून इथे जोडण्यात येणार आहे. म्हणजे जवळपास ३०० एकरचं मोठं सेंट्रल पार्क मुंबईकरांना वापरायला मिळणार आहे. हा फार मोठा प्रकल्प होणार आहे. मुंबई चोवीस तास सुरु असते. मुंबईकरांना थोडा आराम मिळायला पाहिजे. त्यांच्यासाठी मोठा ऑक्सिजन पार्क पाहिजे. त्यामुळे हा पार्क ३०० एकर मध्ये बांधण्यात येणार आहे, असंही शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com