ताज्या बातम्या
दिल्लीतील NDA बैठकीत एकनाथ शिंदेंची धैर्यशील भूमिका, मोदींच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक
दिल्लीतील एनडीए बैठकीत 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल शिंदेंचा महत्त्वपूर्ण ठराव
आज दिल्ली येथे NDA ची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये द्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर घटक पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांनी 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल एक महत्त्वपूर्ण ठराव मांडला.भारताच्या संरक्षण दलांच्या शौर्यपूर्ण कारवायांचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक, धैर्यशील आणि राष्ट्रहिताचे नेतृत्वाचे विशेष कौतुक एकनाथ शिंदे यांनी केले. एकनाथ शिंदे यांच्यावर एनडीएच्या प्रमुख नेत्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'बाबतचा ठराव मांडण्याची जबाबदारी देण्यात आली होती.