Ajit Pawar : "मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं पण...", अजित पवारांच्या वक्तव्याकडे वेधलं लक्ष
जामोरी मैदानात जागतिक कामगार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी अजित पवार यांनी भाषण केले. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या भाषणांकडे चांगलेच लक्ष वेधले. ते म्हणाले की, "जागतिक कामगार दिन हा उत्साहात साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अलीकडच्या काळात महिलांना संधी मिळायला हवी म्हणून आर्थिक सक्षम करण्याचा निर्णय आम्ही घेतला. महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे असे राही भिडे म्हणाल्या मात्र योग यावा लागतो. आता मलाही वाटत मी मुख्यमंत्री व्हाव मात्र योग कुठे आलाय. कधी ना कधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईन".
नंतर अजित पवार म्हणाले की, "मुख्यमंत्री यांनी 100 दिवसांचा कार्यक्रम दिला होता त्यात अदिती तटकरे यांच्या खात्याला पहिला क्रमांक मिळाला. माझं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच 1 खातं 35 टक्क्यांच्या खाली आहे. आम्हाला त्यावर काम करायचं आहे"