Ajit Pawar
Ajit Pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं विधान, म्हणाले,"महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार..."

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. महायुतीत सामील झालेले घटक पक्ष त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झाला नाहीय.
Published by :
Naresh Shende
Published on

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. महायुतीत सामील झालेले घटक पक्ष त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याने जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झाला नाहीय. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधून मोठं वक्तव्य केलं आहे. सातारा, माढा, नाशिक अशा काही जिल्ह्यातील लोक आम्हाला भेटायला येणार आहेत. महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार हे महाराष्ट्रातून कसे निवडून येतील, यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने आखणी करतोय, असं पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले, "आम्ही कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आवाहन करत आहोत. प्रत्येकाने काय बोलावं, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आम्ही आमच्या सर्व लोकांशी चर्चा करतोय. आम्ही आमच्या महायुतीच्या ४८ जागांबाबतचं २८ मार्चला पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडू . काल सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, आमचे सर्व मंत्री आणि आमदार यांच्याशी चर्चा झाली. काल भुजबळांची भेट झाली नाही. आज ते भेटायला येणार आहेत."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com