Ajit Pawar
Ajit Pawar

"२५ जिल्ह्यात १० हजार हेक्टरचे पंचनामे झाले आहेत"; नुकसानग्रस्त भागाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान

"वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न समोर आहेत. पाण्याचे साठे अतिशय कमी झाले आहेत. ५ टक्के, १० टक्के आणि १५ टक्के कपात झाली आहे"
Published by :

Ajit Pawar Mumbai Speech : वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न समोर आहेत. पाण्याचे साठे अतिशय कमी झाले आहेत. ५ टक्के, १० टक्के आणि १५ टक्के कपात झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये वादळ धडकलं आहे. मान्सूनपूर्व पाऊस काही भागात कोसळला आहे. वादळ वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं. काही ठिकाणी पत्रे उडाले. त्यामुळे २५ जिल्ह्यात १० हजार हेक्टरचे पंचनामे झाले आहेत. पंचनाम्याचं काम सुरु आहे. काही ठिकाणी जनावरं मेली आहे, मनुष्यहानीही झाली आहे. घरांचं आणि पिकांचं नुकसान झालं आहे. टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे. त्याकडेही लक्ष देण्याचं काम केलं जात आहे. २० तारखेला पाचव्या टप्प्यातील महाराष्ट्रातील मतदान झालं. ते झाल्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं की, इथे आचारसंहिता शिथील करा. ज्यामुळे मंत्र्यांना काही निर्णय घेणे सोपं जाईल. कॅबिनेट घेता येईल. कॅबिनेटमध्येही काही निर्णय घेता येतील, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधीत करताना म्हणाले. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईच्या बैठकीत बोलत होते.

अजित पवार पुढे म्हणाले, ज्यांनी आजपासून आमच्या सर्वांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यात आणि देशपातळीवर काम करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्या सर्वांचे धन्यवाद मानतो. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे साक्षीदार आहेत. १० जून १९९९ ला शिवाजी पार्कमध्ये शरद पवार यांच्यासह असंख्य मान्यवरांनी स्वाभिमानाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. परकिय मुद्दा काढून ही स्थापना केली. जो मुद्दा समोर ठेऊन पक्ष काढला, तोच मुद्दा बाजूला केला गेला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्यातच आपण आघाडीत गेलो आणि काँग्रेसचं सरकार स्थापन केलं. त्यानंतरच्या काळात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मान सन्मान दिला गेला नाही. कार्यकर्त्यांचा मान राखणं महाराष्ट्राची संस्कृती आहे.

ती देशाची संस्कृती आहे. पहिल्यापासून सर्वच लोक वडिलधाऱ्यांना आणि इतर लोकांना मान-सन्मान देत आले आहेत. कार्यकर्ता लोकांमध्ये असतो. तो लोकांची आणि पक्षाची कामं करत असतो. १० जूनला आपण पक्षाचा २५ वा वर्ष साजरा करणार आहोत. १९९९ ते २०२४ पर्यंत २५ वर्ष पूर्ण होत असून आपण २६ वा वर्धापनदिन असेल. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवायची आहे आणि तो तसा प्रयत्नही सुरु आहे. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निश्चितच मदत होईल, असंही अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com