Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अयोध्येत घेतलं प्रभू श्रीरामाचं दर्शन; म्हणाले,"कारसेवक, रामसेवक म्हणून..."

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.
Published by :

Devendra Fadnavis Ayodhya Visit : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत प्रभु श्रीरामाचं दर्शन घेतलं. रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, रामलल्ला विराजमान झाल्यानंतर प्रभु श्रीरामांचं दर्शन घेतलं. पहिल्यांदाच मी इथे आलो आहे. मला खूप आनंद झाला आहे. याआधी जेव्हा मंदिराचं काम सुरु होतं, तेव्हा आलो होतो. तसच कारसेवक, रामसेवक म्हणून मी इथे अनेकदा आलो होतो.

फडणवीस पुढे म्हणाले, २२ जानेवारीला रामलल्लांच स्वरुप टीव्हीवर पाहिलं, ते आज प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहता आलं. आज ते स्वप्न पूर्ण झालं. मन प्रसन्न झालं असून खूप आनंद झाला आहे. राममंदिर नव्याने उभारल्यानंतर दर्शनाची प्रचंड ओढ होती. 3 वेळा कारसेवक आणि अनेकदा रामसेवक म्हणून अयोध्येत आलो. पण, आज रामाचे दर्शन घेतल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

देवाला काहीच मागायचे नसते, त्याला सारे काही ठावूक असते. आपल्या हयातीत राममंदिर होईल, हे ठावूक नव्हते. पण, मोदीजींचे आभार की हे मंदिरही झाले आणि त्याचे दर्शन घेण्याची संधीही मला मिळाली. आम्ही निवडणुकीपुरते हिंदू नाहीत. आम्ही रामसेवक आहोत आणि रामाला मानतो सुद्धा, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com