महाराष्ट्राच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे; राष्ट्रवादी कार्यालय बाहेर बॅनर
Admin

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे; राष्ट्रवादी कार्यालय बाहेर बॅनर

महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री एकच दादा अजित दादा अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आले आहेत.

महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री एकच दादा अजित दादा अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पोस्टर मुंबईतील राष्ट्रवादी ऑफिसच्या बाहेर लावलेले दिसून आले. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. यातच आता राष्ट्रवादी कार्यालय बाहेर अजून एक होर्डींग लागले आहे.

या होर्डिंग्जवर महाराष्ट्राची पहिली महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे! असा उल्लेख करण्यात आला आहे. आता पुन्हा एकदा पोस्टरची चर्चा रंगली आहे. "महाराष्ट्रची पहिला महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे!", असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे. यामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com