Maharashtra Grampanchayat Election : सरपंच निवडणुकीबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. सरपंच निवडणुकीबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय दिला आहे.
Published by  :
Team Lokshahi

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. सरपंच निवडणुकीबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय दिला आहे. अविश्वास ठरावामुळे उमेदवार अपात्र ठरत नाहीत. अविश्वास ठरावामुळे पदावरून हटलेल्या उमेदवारांना समान पदाची पोटनिवडणूक लढवता येते, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी एका प्रकरणात हा निकाल दिला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा संबंधित उमेदवारांना पोटनिवडणूक लढण्यास अपात्र ठरवत नाही, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com