ताज्या बातम्या
महायुतीत पालकमंत्री पदाचा तिढा कायम?
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर खातेवाटप झाले आता चर्चा सुरु होती ती पालकमंत्रिपदाची.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यानंतर खातेवाटप झाले आता चर्चा सुरु होती ती पालकमंत्रिपदाची. पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. पालकमंत्रिपदाबाबत राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे. मात्र अजूनही महायुतीचा पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. जवळपास 90 टक्के जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत झाले असून काही जागांवरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच असल्याची माहिती मिळत आहे.
रायगड, कोल्हापूरवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच असल्याची माहिती मिळत असून मुंबई शहर आणि साताऱ्यासाठी भाजप आणि शिवसेना आग्रही असल्याचे समजते. यातच गडचिरोली आणि बीडचे पालकमंत्री पद कुणाला मिळणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.