महाराष्ट्र एकीकरण समितीचे आज कोल्हापूरात धरणे आंदोलन
Admin

महाराष्ट्र एकीकरण समितीचे आज कोल्हापूरात धरणे आंदोलन

महाराष्ट्र एकीकरण समितीची 21 डिसेंबर रोजी मराठा मंदिर येथे बैठक पार पडली.

महाराष्ट्र एकीकरण समितीची 21 डिसेंबर रोजी मराठा मंदिर येथे बैठक पार पडली. या बैठकीत सगळ्यांची मते जाणून घेऊन कोल्हापूरला जाऊन धरणे आंदोलन करणार आहेत. बेळगावात होणाऱ्या कर्नाटक विधीमंडळाच्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला परवानगी नाकारुन दडपशाही करुन पोलिसांनी नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आज कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन ते करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटलेला आहे. या बैठकीत महाराष्ट्र सरकारने देखील एक दिवस महाराष्ट्र बंद करुन आपण सीमावासियांच्या पाठिशी आहोत असे कर्नाटक सरकार आणि कन्नड संघटनांना दाखवून द्यावं असं मतही बैठकीत व्यक्त करण्यात आले.

कोल्हापूरला धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी दोन ते अडीच हजार कार्यकर्ते बेळगावहून जाणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com