महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत, गृहमंत्री शाह यांच्यासोबत बैठक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत, गृहमंत्री शाह यांच्यासोबत बैठक

कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यावर आपला दावा सांगितल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यावर आपला दावा सांगितल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सीमावाद चिघळलेला असतानाच कन्नड संघटनांनी 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली होती. हिरेबागवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून ही दगडफेक करण्यात आली.

याच पार्श्वभूमीवर आता आज दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मध्यस्थीनंतर कर्नाटकाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीआधी बेळगाव जिल्हा कन्नड कृती समितीकडून बोम्मई यांना पत्र लिहण्यात आलं आहे.

त्यामुळं आज अमित शाह यांच्या मध्यस्थीला यश येणार का? सीमावादाबाबत गृहमंत्री नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या मुद्यावरुन महाविकास आघाडीच्या खासदारांनी 9 डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या खासदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची अमित शाह यांच्याकडे तक्रार केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com