आज महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत, मॅट विभागात शिवराज विरुद्ध हर्षवर्धन तर माती विभागात सिकंदर विरुद्ध महेंद्र
Admin

आज महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत, मॅट विभागात शिवराज विरुद्ध हर्षवर्धन तर माती विभागात सिकंदर विरुद्ध महेंद्र

आज महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत होणार आहे. पुणे येथे सुरु असलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आज अंतिम थरार रंगणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आज महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत होणार आहे. पुणे येथे सुरु असलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आज अंतिम थरार रंगणार आहे. ही महाराष्ट्र केसरची गदा कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मॅट विभागातील अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात होणार आहे. तर माती विभागातील अंतीम लढत सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात होणार आहे.

2019 चा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याच्याशी होणार आहे.आज संध्याकाळी आधी अनुक्रमे मॅट आणि त्यानंतर माती विभागातील दोन अंतीम लढती खेळवण्यात येणार आहेत. यातील विजेत्यामधून महाराष्ट्र केसरीची अंतीम लढत खेळवण्यात येईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com