कुस्तीपटूंना मानधनासोबतच निवृत्तीवेतन आणि वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार : चंद्रकांत पाटील
Admin

कुस्तीपटूंना मानधनासोबतच निवृत्तीवेतन आणि वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार : चंद्रकांत पाटील

कुस्तीपटूंना मानधनासोबतच निवृत्तीवेतन आणि वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कुस्तीपटूंना मानधनासोबतच निवृत्तीवेतन आणि वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व संस्कृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कुस्तीमहर्षी स्व.मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी कोथरुड इथे आयोजित 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022-23 च्या उद्घाटन प्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते.

10 ते 14 जानेवारी 2023 या कालावधीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातून सुमारे 950 कुस्तीपटू सहभागी झाले असल्याची माहिती आयोजक आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे उत्तम नियोजन मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. या निमित्ताने मोठे मैदान, आकर्षक बक्षिसे तसेच खेळाडूंसाठीही उत्तम व्यवस्था करण्यात आली. तसेच राज्य शासनाने राज्य स्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग तीनच्या पदावर, राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग दोनच्या पदावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला वर्ग एकच्या पदावर थेट नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. असे देखिल चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com