Shikhar Pahariya : माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाची भाषा वादात उडी, पोस्ट शेअर करत म्हणाला, " इतरांना धमकी देऊन..."

Shikhar Pahariya : माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाची भाषा वादात उडी, पोस्ट शेअर करत म्हणाला, " इतरांना धमकी देऊन..."

मराठी भाषेच्या अस्मितेवर शिखर पहाडियाचे विचार, सोशल मीडियावर पोस्ट वायरल
Published by :
Team Lokshahi
Published on

सध्या मराठी भाषेवरून वातावरण तापलेले असताना त्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नातवानेही यामध्ये उडी मारली आहे. माजी मुख्यमंत्री यांचा नातू शिखर पहाडिया याने मराठी भाषेबद्दलची आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. मराठी भाषा ही इतरांना धमकी देऊन नाही तर सर्वांच्या सहकार्याने समृद्ध होऊ दया. अशा आशयाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर वायरल होत असून त्याच्या या वक्तव्याला गर्लफ्रेंड जान्हवी कपूरने पाठिंबा देत त्याची पोस्ट शेअर केली आहे.

महाराष्ट्रामध्ये मराठीच्या मुद्यावर सर्वत्र वादविवाद होत असताना यामध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आणि प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर हिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया याने मराठी भाषेबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. " आपली मराठी भाषा आणि तिची अस्मिता इतरांना धमकी देऊन नाही तर त्या सगळ्यांच्या सहकार्याने समृद्ध होऊ द्या. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी तिचा हत्यारासारखा वापर करू नका. त्यापेक्षा भाषेचे अस्तित्व जपा आणि तिचे रक्षण करा. मराठी भाषेमुळे कोणामध्येही फूट पडता कामा नये .

आपण आपल्या भारतात कुठेही असलो तरी आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान बाळगता आला पाहिजे. यामधून कोणताही पूर्वग्रह निर्माण होता काम नये. मराठीची अस्मिता ही खरी आहे. मी सोलापूरचा मराठी माणूस असल्यामुळे मला याबाबत नक्कीच माहिती आहे. केवळ मराठीच नाही तर प्रत्येक भाषा आपल्याला घडवते आपल्याला प्रेरणा देते. विविध प्रकारच्या कथा कवितांमधून भाषा एक प्रकारची वैचारिक क्रांती मिळवून देते. आपली मराठी भाषा सुद्धा तशीच आहे. त्यामुळे इतर भाषांप्रमाणेच मराठी भाषा जपली पाहिजे. मात्र हे करत असताना इतरांच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असे कृत्य करता काम नये. सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांचा सुद्धा आदर करून आपण आपली भाषा जपली पाहिजे."

"सोलापूरमधील अनेक लोक आज कामानिमित्त दिल्ली, चेन्नई, कलकत्ता याठिकाणी जाऊन राहत आहेत. त्यांना सुद्धा भाषेसाठी अपमानित केले गेले तर विचार करा त्यांना कसे वाटेल?त्यांना या गोष्टींचा किती त्रास होऊ शकतो ? जी लोक कठोर परिश्रम करतात, त्यांच्या कुटुंबांपासून दूर असतात त्यांच्यावर अन्याय करून किंवा हिंसक मार्गाने आपली भाषा लादणे योग्य नाही. लोक हिंदी, तमिळ किंवा गुजराती बोलतात ही खरी शोकांतिका नाही.खर म्हणजे मराठी भाषेला धोका आहे असं मानण चुकीचे आहे. एखाद्याला धमकावून किंवा त्याला भीती घालून आपण आपली भाषा जिवंत ठेवू शकत नाही. त्यामुळेच सगळ्यांना धमकी देऊन किंवा भीती घालून किंवा जबरदस्तीने आपली मराठी टिकवण्यापेक्षा त्या सर्वांना सोबत घेऊन मराठी पुढे न्या" शिखर पहाडियाने अश्या भावनिक पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठी भाषेबद्दल आदर व्यक्त करत तिला कश्याप्रकारे जपली पाहिजे या आशयाची पोस्ट शिखर पहाडियाने इंस्टग्रामवर टाकली असून ती प्रचंड वायरल होताना दिसत आहे. इतकेच नव्हे अभिनेत्री जान्हवी कपूर हिने सुद्धा शिखरच्या पोस्टला आपला जाहीर पाठींबा दर्शवत पोस्ट शेअर केली आहे. आता यावर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्या नातवाच्या या पोस्टवर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com