जल संवर्धन योजनांच्या बाबतीत महाराष्ट्र देशभरात आघाडीवर
Admin

जल संवर्धन योजनांच्या बाबतीत महाराष्ट्र देशभरात आघाडीवर

जल संवर्धन योजनांच्या बाबतीत महाराष्ट्र देशभरात आघाडीवर

चेतन ननावरे, मुंबई

देशभरातील तळी, टाक्या, तलाव आणि इतर जलसाठ्यांच्या संदर्भातील समावेशक माहिती कोष असलेला भारतातील जलाशयांच्या पहिल्या गणनेचा अहवाल केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने जाहीर केला आहे. वर्ष 2018-19 मध्ये करण्यात आलेल्या या गणनेमध्ये देशातील सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्या क्षेत्रातील 2.4 दशलक्षाहून अधिक जलाशयांची मोजणी करण्यात आली.

महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे या अहवालातील माहितीनुसार, जलसंवर्धन योजनांच्या बाबतीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक संख्येने तळी आणि इतर जलसाठे आढळले आहेत. देशातील विविध राज्यांमधील टाक्यांच्या संख्येचा विचार करता आंध्रप्रदेशात त्यांची संख्या सर्वात जास्त असल्याचे दिसून आले आहे. तर देशातील सर्वाधिक तलाव तामिळनाडू राज्यात आहेत, असे दिसते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com