Admin
बातम्या
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी लांबणीवर; 28 मार्चला होणार सुनावणी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य आज ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य आज ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी लांबणीवर गेली आहे.
आज सकाळी 11 वाजता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भवितव्याबाबत याचिकेवर सुनावणी झाली. आता याची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. पुढच्या आठवड्यात 28 मार्चला आता सुनावणी पार पडणार आहे.
23 महानगरपालिका, 207 नगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समिती अशा सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत. गेल्या दोन तीन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या या निवडणुका लांबणीवर पडल्यात.