Yamini Jadhav : मोठी बातमी! मुंबईत शिंदे सेनेच्या यामिनी जाधवांचा दणदणीत विजय
मुंबई महापालिका निवडणुकीचे 2026 चे निकाल समोर आले आहेत आणि काही प्रभागांमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. शिंदे गटातील यामिनी जाधव यांनी प्रभाग क्रमांक 209 मध्ये विजय मिळवला आहे. विधानसभेतील आणि लोकसभेतील पराभवानंतरही यामिनी जाधवने नगरसेवक म्हणून आपली ताकद दाखवली.
वॉर्ड क्रमांक 184 मध्ये ठाकरे गटातील वर्षा नकाशे विजयी झाल्या, तर वॉर्ड 156 मध्ये शिंदे गटाची अश्विनी माटेकर यांनी ठाकरे गटाच्या संजना कासले यांचा पराभव केला. वॉर्ड 157 मध्ये शिंदे गटाची सरिता म्हस्के यांनी भाजपच्या आशा तायडे यांना पराभूत केले, तर वॉर्ड 4 मधून शिंदे गटाचा मंगेश पांगरे विजयी झाला.
भाजपकडून प्रभाग क्रमांक 22 मध्ये हिमांशु पारेखने बाजी मारल्यामुळे पक्षाची मुंबईतील आकडेवारी 93 वर पोहोचली आहे. सध्याच्या निकालानुसार, मुंबईत भाजप 93, शिंदे गटाची शिवसेना 29, ठाकरे गटाची शिवसेना 61, मनसे 9, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी 13, राष्ट्रवादी 2 आणि इतर 8 जागांवर आघाडीवर आहेत.

