विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी - विरोधक समोरासमोर

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी - विरोधक समोरासमोर

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. पेपरफुटीच्या विरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहेत. पेपरफुटी विरोधात कठोर कायदा झालाच पाहिजे. असा फलक हातात घेत विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन करण्यात येत आहे.

याचवेळी विरोधकांचे आंदोलन सुरु असताना सत्ताधारी यांनीसुद्धा त्याठिकाणी येत आंदोलन सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर आल्याचे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी त्या ठिकाणी येताच विरोधकांनी त्या ठिकाणी ठिय्या मांडून बसले आहेत. यावेळी सत्ताधारी आणि विरोधक यांचे आंदोलन सुरु असून जोरदार घोषणाबाजी देण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com