भारतातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र कबुतर केसरी स्पर्धेला सुरवात

भारतातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र कबुतर केसरी स्पर्धेला सुरवात

भारतातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र कबुतर केसरी स्पर्धेला सुरवात झालीय.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय देसाई,सांगली

भारतातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र कबुतर केसरी स्पर्धेला सुरवात झाली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून या स्पर्धेसाठी सुमारे 110 कबुतर पेटी चालकांनी सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे या कबुतर स्पर्धेतील पहिल्या विजेत्याला 4 लाखाचे बक्षीस असल्याने या स्पर्धेला मोठे महत्व निर्माण झाले आहे. ज्याची कबुतरे जास्तवेळ आकाशात राहतील त्याला विजेता घोषित. केला जातो. विशेष म्हणजे सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्पर्धेवर लक्ष असल्याने गेली 14 वर्षे या स्पर्धा विना तक्रार आणि पारदर्शी सुरू आहेत.

14 वर्षापूर्वी पिजन फलायर्स असोशियन इस्लामपूरचे संस्थापक शिवाजी पवार यांच्याकडून राज्यात कबुतर उडवण्याचा या स्पर्धा सुरू करण्यात आल्या. यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कबुतर पेट्या सहभागी होतात. यामध्ये ज्या स्पर्धक पेटीतील कबुतरे सर्वात जास्त वेळ आकाशात राहतील त्या कबुतर पेटीला विजेता ठरवला जातो. या स्पर्धा 14 वर्षापासून पारदर्शी सुरू आहे. स्पर्धेत कोणत्याही प्रकारे डोपिंग होऊ नये यासाठी स्पर्धक कबुतर पेट्या स्पर्धेच्या आदल्या दिवशीच सिल केल्या जातात. त्यानंतर त्याठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवले जातात.

जेणेकरून स्पर्धेपर्यंत सर्व घडामोडींवर लक्ष ठेवता येईल. स्पर्धेच्या दिवशी सकाळी साडे सहा वाजता पंचाच्या उपस्थितीत सिल पेट्या उघडल्या जातात . यावेळी पंचासमक्ष स्पर्धेतील सात कबुतरांना ताजे आणि स्वच्छ पाणी पाजले जाते. यानंतर बरोबर 7 वाजता स्पर्धक कबुतरे आकाशात उडविली जातात. यानंतर आकाशात उडलेली कबुतरे ही पुन्हा आपल्या पेटीकडे येण्याची वेळ स्पर्धेसाठी ग्राह्य मानली जाते. मागील वर्षी 62 तास आकाशात असणाऱ्या कबुतर पेटि विजेता ठरली होती. त्यामुळे आता या वर्षीचे विजेते बनण्यासाठी कबुतर मालकांची धडपड सुरू आहे.

दरम्यान, महाराष्ट्र कबुतर केसरी स्पर्धा ही भारतातील सर्वात मोठी स्पर्धा बनली आहे. त्यामुळे पहिल्या वर्षी 40 कबुतर पेट्या वरून यंदाच्या वर्षी या स्पर्धेत 110 कबुतर पेट्या सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कबुतर केसरी स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजक सांगतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com