बातम्या
सत्तासंघर्षाची सुनावणी पुढील वर्षात; 10 जानेवारीला होणार सुनावणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या गटांदरम्यानच्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोरील सुनावणी आणखी पुढे ढकलण्यात आली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या गटांदरम्यानच्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोरील सुनावणी आणखी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सुनावणी 10 जानेवारीला होणार आहे. घटनापीठासमोर युक्तिवाद झाला. यावेळी ठाकरे गटाच्या वकिलांनी सदर खटला सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर चालवावा, अशी मागणी केली. मात्र कोर्टाने तूर्तास ती फेटाळून लावली.
शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसंदर्भातील, यासोबतच राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार कक्षांचा उहापोह करणाऱ्या या महत्त्वाच्या खटल्याची पुढील सुनावणी येत्या 10 जानेवारी रोजी होईल, असे आदेश कोर्टाने दिले.