Babanrao Lonikar : "तुमच्या अंगावरचे कपडे, पायातले बूट..." ; भाजपच्या बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा घसरली
Babanrao Lonikar’s Controversial Statement : भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सोशल मीडियावर सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर लोणीकर यांनी भाषणातून आगपाखड केली आहे. कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त असल्याचे लिहितात. याच कूचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचे पेन्शन बबनराव लोणकर यांनीच केला आहे असे वक्तव्य लोणीकर यांनी केले. तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत असेही लोणीकर म्हणाले.
पुढे लोणीकर म्हणाले की, "तुझ्या वडिलांना पेरणीचे पैसे पंतप्रधान मोदींनी दिले आहे, तुमच्या अंगावरचे कपडे पायातले बूट, मौबाईलही सरकारमुळे आहे. आमचंच घेऊन आमच्याविरुद्ध का बोलता?"