ताज्या बातम्या
Nitesh Rane on Aaditya Thackeray : "ठाकरेंच्या मुलाला पावसाळ्यात जेलवारी...", नितेश राणे यांचा पुन्हा एकदा निशाणा
दिनो मोरिया प्रकरणात ठाकरे कुटुंबावर नितेश राणे यांचा जोरदार हल्ला
दिनो मोरिया प्रकरणावरून नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचा मुलगा पावसाळ्यात जेलची वारी करू शकतो अस म्हणत मंत्र नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांच्या अटकेचे संकेत दिले आहेत.
दिनो मोरिया प्रकरणात होणाऱ्या कारवाया आणि प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच एकत्रीकरणाची चर्चा असल्याचाही राणे म्हणाले. दिनो मोरिया प्रकरणात उद्धव ठाकरे यांचा मुलगा जेलची वारी करू शकतो अशी माहिती असल्याचा मोठा दावा नितेश राणेंनी केला. दिनो मोरिया कोणासोबत बसायचा कोणासोबत घनिष्ट संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत असल्याचही त्यांनी सांगितलं. राणे यांच्या आरोपाला आता ठाकरे काय उत्तर देणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.