Ladki Bahin Yojana : "'लाडकी बहीण योजने'चे 2100 रुपये मिळणारच...", संजय शिरसाट यांचा अखेर खुलासा

मात्र आता मंत्री संजय शिरसाट यांनी 2100 रुपयांबद्दल भाष्य केले आहे.
Published by :
Shamal Sawant

महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana)सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र महिलेला दरमहा 1500 रुपये दिले जातात. त्यानंतर बहीणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये मिळणार असल्याचे देखील समोर आले होते. मात्र आता मंत्री संजय शिरसाट (sanjay shirsat) यांनी 2100 रुपयांबद्दल भाष्य केले आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, "राज्याचे बजेट एकंदरीत अडीच लाख कोटीचे आहे त्यात सामाजिक न्याय विभागाला नियमानुसार 11.8 टक्के बजेट मिळाले पाहिजे. जवळपास माझ्या खात्यात 29,500 कोटी मिळाले पाहिजे पण मला 22 हजार 688 कोटी मिळाले. यात काय काय टाकले आहे तर लाडकी बहीण योजना, घरकुल योजना, मुख्यमंत्री बळीराजा मदत यासाठी जवळपास 6 हजार 500 कोटी टाकलेत. 22 हजार कोटी मधून 6 ते 7 हजार कोटी कमी झाले".

पुढे शिरसाट म्हणाले की, "लाडक्या बहिणींसाठी 3 हजार कोटी विविध योजनेसाठी 7 हजार कोटी दिले आहेत. मला केवळ 15 हजार कोटी रुपये मिळाले, त्यातील 7 हजार कोटी दुसऱ्या योजनेला गेले आहेत. त्यामुळे, मला 3 हजार कोटी रुपये देणे आहे. मुख्यमंत्र्यांना मी लेखी पत्र दिलं आहे, अजित पवार यांना देखील विनंती केली आहे".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com