Uddhav Thackeray : सणासुदीच्या काळात मराठवाड्यात ठाकरेगटाला धक्का
Uddhav Thackeray : सणासुदीच्या काळात मराठवाड्यात ठाकरेगटाला धक्का; अनेक कार्यकर्त्यांच्या हाती कमळUddhav Thackeray : सणासुदीच्या काळात मराठवाड्यात ठाकरेगटाला धक्का; अनेक कार्यकर्त्यांच्या हाती कमळ

Uddhav Thackeray : सणासुदीच्या काळात मराठवाड्यात ठाकरेगटाला धक्का; अनेक कार्यकर्त्यांच्या हाती कमळ

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी 2026 च्या अखेरपर्यंत होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी २०२६ च्या अखेरपर्यंत होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. यामध्ये राज्यात राजकीय उलथापालथ दिसत आहे, अनेक ठिकाणी नेत्यांची पक्ष बदलाची प्रक्रिया सुरु आहे.

अकोला जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. बाळापूर तालुक्यातील शिवसेनेचे जेष्ठ नेते उमेश जाधव आणि त्यांचे सहकारी 18 ऑक्टोबर रोजी भाजपमध्ये प्रवेश केले. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाची ताकद बाळापूर मध्ये कमी झाली आहे, आणि भाजपला फायदा होईल, असे मानले जात आहे.

भारतीय जनता पक्षाचे खासदार अनुप धोत्रे यांच्या निवासस्थानी उमेश जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला, ज्याला अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com