विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी निवडणूक, कोण मारणार बाजी ? निवडणुकीचे स्वरूप जाणून घ्या
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता सगळ्यांचे लक्ष आता विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. भाजपच्या तीन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एक आणि शिवसेना शिंदे गटाच्या एका आमदारासाठी ही निवडणूक होणार आहे. या विधानपरिषदेच्या रिक्त जागांवर आता कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महायुतीमधील भाजपचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 1 आणि शिवसेना शिंदे गटाची एक जागा रिक्त आहे. या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीमुळे पाच नवीन कार्यकर्त्यांना आमदार होण्याची संधी प्राप्त झाली असून त्यातील तीन भाजपाचे एक एक आमदार शिंदे आणि अजित दादा गटाचे असतील. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानुसार 10 मार्च ते 17 मार्च अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल. तसेच अर्जाची छाननी 18 मार्च रोजी होणार आहे. 20 मार्चला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल तर 27 तारखेला विधान परिषद जागांसाठी मतदान पार पडेल.
भाजपचे आमदार, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड यांच्यासह शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुणाची लॉटरी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.