बातम्या
Maharashtra Rain : आज कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा
आज कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 13 ते 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं पिकांचं नुकसान झालं आहे. मुंबईत देखील आज काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे.