येत्या 5 दिवसात 'या' भागात जोरदार पाऊस

येत्या 5 दिवसात 'या' भागात जोरदार पाऊस

राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी आहेत. कुठे ऊन तर कुठे पाऊस असे वातावरण आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात जोरदार पाऊस कोसळणार आहे. विजांच्या कडकडाटासह गारपिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढचे पाच दिवस हा अवकाळीचा तडाखा राहणार आहे.

येत्या 21 आणि 22 एप्रिल रोजी उत्तर भारतात जोरदार पाऊस होणार आहे. अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये मध्यम पाऊस पडणार आहे. तसेच कर्नाटकातील काही भाग, तामिळनाडू, केरळमध्ये येत्या ५ दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com