ताज्या बातम्या
Maharashtra Rain : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे धुमशान
पावसाने आज पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे.
पावसाने आज पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. पावसामुळे रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. तसेच कुठेही वाहतूक कोंडी झालेली नाही. आज पहाटेपासूनच मुंबईसह ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाडसह मुंबई उपनगरातील सर्व भागात आता पाऊस पडत आहे. नवी मुंबईसह पनवेल आणि रायगडमध्येही पावसाने जोर धरला आहे.
या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.