ताज्या बातम्या
Rain Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती मिळत आहे. 3, 4 आणि 5 सप्टेंबरला दमदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यात बहुतांश भागात 3 ते 5 सप्टेंबरला पावसाचा जोर वाढणार असून तीन दिवस विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्यास सुरुवात झाली असून पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याची माहिती मिळत आहे.