राज्यात अवकाळी पाऊस; पिकांचं नुकसान

राज्यात अवकाळी पाऊस; पिकांचं नुकसान

राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी आहेत. कुठे ऊन तर कुठे पाऊस असे वातावरण आहे. अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार वारा सुटल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. भारतीय हवामान खात्याने अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, 6 ते 8 मार्च दरम्यान, मध्य आणि पश्चिम भारतात वादळासह पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. 6 ते 7 मार्च रोजी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com