Jejuri : पाऊसच खंडोबाच्या सेवेत ! जेजूरी गड पायऱ्यांना पिवळ्या धबधब्याचे स्वरूप

खंडोबाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना पावसाचा सामना, जेजुरी गड स्वच्छ
Published by :
Shamal Sawant

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातलेला बघायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे, मुंबईला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. वेळेआधीच पाऊस दाखल झाल्याने नागरिकांची तारांबळ उडालेलीदेखील दिसून येत आहे. अशातच आता अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज जोरदार पाऊस झालाय पावसाचे पाणी पायरी मार्गावरून जोरदार वाहत होतं. त्यामुळे खंडोबाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना गडावर जाताना पावसाचा सामना करावा लागला आहे.

आज दुपारी जेजुरी गडावर जोरदार पाऊस झाला. या पावसाचं पाणी पायरी मार्गावरून जेजुरीमध्ये आले. या जोरदार झालेल्या पावसाने मंदिर परिसर आणि पायरी मार्ग स्वच्छ झाला. तसेच पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गडावरुन वाहत असल्याने जेजूरी गड धुवून निघाला आहे. सर्वत्र पिवळे पाणी दिसून आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com