समृद्धी महामार्गावर रिल्स काढाल, तर सरळ तुरुंगात; महामार्ग वाहतूक पोलिसांचा इशारा
समृद्धी महामार्गावर अनेकदा वाहन चालक थांबून फोटो किंवा व्हिडीओ बनवून किंवा सोशल मीडियावर टाकण्यासाठी रिल्स बनवतात. काही दिवसांपूर्वी असेच काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. याची आता महामार्ग वाहतूक पोलिसांसह जिल्हा वाहतूक शाखेनं याची गंभीर दखल घेतली आहे.
समृद्धी महामार्गावर आता कुणी रील्स काढले तर थेट तुरुंगात जावे लागणार आहे. समृद्धीवर हुल्लडबाजी करणाऱ्यांना आता एक महिन्याची कैद आणि दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याचा इशारा देण्यात आला आहे. वेगानं जाणाऱ्या वाहनांना अनेकदा अशा कृत्यामुळे अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता असते.
समृद्धी महामार्गावर फोटो किंवा व्हिडीओ शूट केले तर कलम 341 नुसार, एक महिना कारावास किंवा पाचशे रुपये दंड तसेच कलम 283 नुसार, कोणत्याही व्यक्तीला धोका किंवा इजा होईल, असं कृत्य केल्यास दोनशे रुपये दंड ठोठावण्याची कारवाई करण्यात येणार आहे.