Sanjay Raut Book Narkatla Swarg : 'ज्यांनी मला पकडलं त्याला पश्चाताप झाला, आम्ही गुंडे लोक,' राऊतांचं वक्तव्य
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. तुरुंगात असताना राऊतांनी आपले अनुभव या पुस्तकात सांगितले आहेत. पुस्तकाला 'नरकातला स्वर्ग'हे नाव कसे पडले असा प्रश्न अनेकांना पडला. त्या पुस्तकाचे नाव पुण्यातील उद्योगपती यांनी सुचवले आहे.
ईडीबद्दल राऊत काय म्हणाले?
शरद पवार आमच्यासाठी पडद्यामागे लढ्या लढत असतात. यापुढे ईडी आपल्या दारापुढे येणार नाही मी XXX लावल आहे. ईडीच्या नादाला लागणारा मी शेवटचा व्यक्ती आहे. एखाद्या पुस्तकाची जर चर्चा होत नसेल तर त्याचा उपयोग काय? दोन दिवसांपासून विरोधकांना मिरच्या लागल्या आहेत. पुस्तकामध्ये जे लिहिलं आहे, ते सत्य आहे. हे पुस्तक तुरुगांमध्ये लिहिलं आहे.
राऊतांचा मुख्यमंत्र्यांना नाव न घेता टोला
तुरुगांमध्ये एक मिनीट एक वर्षासारखा वाटतो. आत गेलो की, जगाशी आपला संबंध तुटतो. तुरुगांमधील उंदीर ,घुशी सश्या सारख्या गुटगुटीत आहेत, त्यांची नाव देशमुखांनी ठेवली होती, त्याच्याबद्दल आता बोलू नये, कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, राऊतांचा मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. तुरुगांत असताना सामनाचा माझा अग्रलेख दररोज बाहेर येत होता. 80 टक्के पुस्तक तुरुंगात लिहून झालं. 20 टक्के पुस्तक लिहायला दोन वर्ष लागली. पुस्तकामध्ये रडगाणं नाही आहे. ज्यांना विरोधी पक्षात काम करायचं आहे अशा लोकांनी पुस्तक वाचू नये. सत्तेची चाटूगरी करणाऱ्या लोकांनी हे पुस्तक वाचू नये. सत्ताधाऱ्यांना राऊतांचा टोला दिला. ज्यांनी मला तुरुगांत टाकले, त्यांना आता पश्चाताप होत आहे. आम्ही गुंडे लोक आहोत. महाराष्ट्राला त्यांची गरज आहे.