Maharashtra Weather : राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट; हवामान खात्याचा इशारा

राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

उन्हाचा कडाका वाढला आहे. नागरिक उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. यात आता राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून आज आणि उद्या यलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज पुणे शहरासह सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागात आज पावसाची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com