ताज्या बातम्या
Vidarbha Heatwave : उन्हाचा पारा चढला! विदर्भाला 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात मे महिन्यासारखी उष्णता आताच जाणवू लागली आहे.
यातच आता विदर्भाला 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर व पश्चिम दिशेने उष्ण वारे वाहत असल्याने विदर्भात उष्णतेची लाट आली असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. बहुतांश जिल्ह्यातील तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे.
तापमानाचा पारा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून गेल्या काही दिवसांपासून विदर्भात तापमान वाढतच चालला असल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांनी दुपारी 12 ते ४ वाजताच्या दरम्यान घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.