ताज्या बातम्या
Maharashtra Weather : उन्हाचा पारा चढला, आज तापमान जाणार 45 पार; 'या' जिल्ह्यांसाठी अलर्ट
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. राज्यात मे महिन्यासारखी उष्णता आताच जाणवू लागली आहे.
यातच आता हवामानात मोठे बदल होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला असून तापमान 42 ते 45 डिग्रीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी दुपारच्या वेळात घराबाहेर पडू नये असा इशारा देण्यात आला आहे.
पुणे, सातारा, सांगली, जळगाव, नाशिक, धुळे, कोल्हापूर, सातारा, नंदुरबार, अहिल्यानगर, या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.