Eknath Shinde
Eknath Shinde

"महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याच्या घोषणेनं विरोधक 'गॅस'वर आले"; CM एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीवर निशाणा

"उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे"
Published by :

Cm Eknath Shinde On Maharashtra Assembly Budget : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. आम्ही सर्वसामान्यांचं सरकार जेव्हा म्हणतो, तेव्हा शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, युवा, वारकरी या सर्वांचा समावेश त्यामध्ये आहे. या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना. आमच्या बहिणींच्या खात्यात महिन्याला थेट दीड हजार रुपये जमा होणार. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून आम्ही महिलांना तीन सिलेंडर मोफत देणार आहोत. त्यामुळे विरोधक गॅसवर आले आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले,आमचं सरकार आल्यावर आम्ही सरकारी नोकऱ्यांवर असलेले निर्बंध हटवले. जवळपास १ लाख मुलांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. जर्मनीत ४ लाख नोकऱ्यांचा एमओयू राज्यसरकारने साईन केला आहे. जे सुक्षिक्षीत बेरोजगार आहेत, त्यांना आम्ही दहा हजार रुपये अप्रेंटिशीप देणार आहोत. हा ऐतिहासीक निर्णय राज्यात पहिल्यांदा होत आहे.

लाडका भाऊ योजना राबवावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते, यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लाडका भाऊ योजना आम्ही सुरु केलीय. त्यासाठी दहा हजार रुपये देत आहोत. पण त्यांनी अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही राबवल्या. शेतीपंप वीज सवलत योजना शेतकऱ्यांसाठी आम्ही सुरु केली आहे. राज्यातील मुलींचं शिक्षण मोफत देणार असल्याच्या योजना आम्ही योजना केल्या. सरकार दिलेला शब्द पाळणार आहे. अर्थसंकल्पात पैशांची तरतूद करून या योजना सुरु केल्या आहेत. या योजना पूर्णपणे राबवल्या जातील.

दुधाला ५ रुपयांची वाढ केली आहे. सोयाबीन आणि कापसाला साडेचार हजार कोटींची तरतूद केली आहे. त्याचंही वाटप होईल. गेल्या दोन वर्षात आम्ही नियम निकष बदलले. १५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिलं. प्रधानमंत्री योजनेतून ६ हजार आणि राज्य सरकारकडून ६ हजार , पीकवीमा योजना एक रुपया असे ४५ हजार कोटी शेतकऱ्यांना दिलं. विरोधकांनी हिशोब घेऊन टॅली करावं. खोटं नरेटिव्ह सेट करून ज्यांनी लोकसभेत काही मतं मिळवली. आता जनता फसणार नाही. आमचा अर्थसंकल्प पाहून त्यांचे चेहरे उतरले होते. विधानसभेत आम्ही दोन वर्ष जे काम केलं आहे, त्याची पोचपावती जनता आम्हाला देईल, असंही शिंदे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com