ताज्या बातम्या
महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीकडून राज्यभर मूक आंदोलन
महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीकडून राज्यभर मूक आंदोलन
बदलापूरमधील एका शाळेमध्ये दोन शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र मविआच्या बंदला मुंबई हायकोर्टाकडून मज्जाव केला.
बंद मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीकडून राज्यभर मूक आंदोलन करण्यात येणार आहे. शरद पवार पुण्यात तर उद्धव ठाकरे यांचं मुंबईत आंदोलन असणार आहे. काँग्रेस पक्ष ठाण्यात निषेध रॅली काढणार आहेत.
यासोबतच शरद पवार पवार पुण्यातील डॉ.आंबेडकर पुतळ्यासमोर बसत आंदोलन करणार असून काळ्या पट्ट्या बांधून बदलापूर घटनेचा निषेध करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे शिवसेना भवनसमोर बदलापूर घटनेचा निषेध करणार आहेत.