Admin
बातम्या
खोदा पहाड निकला चुहा, बजेटचा डोंगर, निघाला उंदीर; अर्थसंकल्पावर महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक
खोदा पहाड निकला चुहा, बजेटचा डोंगर, निघाला उंदीर; अर्थसंकल्पावर महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक
मिनाक्षी म्हात्रे, मुंबई
खोदा पहाड, निकला चुहा... शेतकऱ्यांवर अन्याय करणार्या सरकारचा धिक्कार असो... बजेटचा डोंगर, निघाला उंदीर...अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजही विधानभवनाच्या पायर्यांवर येत अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा अकरावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.