महाविकास आघाडी टिकेल अशी कुठली चिन्ह दिसत नाहीत”; 'या' नेत्याने सांगितली मविआ फुटण्याची कारणं
Admin

महाविकास आघाडी टिकेल अशी कुठली चिन्ह दिसत नाहीत”; 'या' नेत्याने सांगितली मविआ फुटण्याची कारणं

सत्ताधाऱ्यांरी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात.

सत्ताधाऱ्यांरी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. यातच आता राज्य उत्पादक शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शंभूराज देसाई म्हणाले की, कुठल्या छोट्या नेत्याने वक्तव्य करणं ते वेगळं होतं मात्र शरद पवारानंतर आता अजित पवार यांच्याकडूनही तेच वक्तव्य केले जात असेल तर कठीण आहे . जे आमचे नेते होते त्यांचा दरारा होता ज्या मातोश्रीचा दरारा सगळ्या देशात होता त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःची काय अवस्था करून घेतली हे बघताना मला खंत वाटते. असे शंभूराज देसाई म्हणाले.

तसेच 56 वरून आमदारांची संख्या आता 15 वर आली आहे. हा वाद कधी ना कधी होणारच होता. त्यामुळे मला यात काही विशेष वाटत नाही. या वादामुळेच महाविकास आघाडी टिकेल अशी कुठलीही चिन्हं आता दिसत नाहीत. महाविकास आघाडीमध्ये छोटा भाऊ, मोठा भाऊ हे होणारच होतं. ज्यावेळी आमचे 56 आमदार होते त्यावेळी महाविकास आघाडीमधला एक नंबरचा पक्ष होता. मविआची आघाडी जास्त दिवस टिकेल असं दिसून येत नाही. असे शंभूराज देसाई म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com