पदवीधर निवडणुक : मविआचा पाठिंबा कोणाला? आज होणार जाहीर

पदवीधर निवडणुक : मविआचा पाठिंबा कोणाला? आज होणार जाहीर

पदवीधर निवडणुकीवरून सध्या चांगलाच वाद सुरु आहे. यावरुन अनेक प्रतिक्रिया देखिल येत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पदवीधर निवडणुकीवरून सध्या चांगलाच वाद सुरु आहे. यावरुन अनेक प्रतिक्रिया देखिल येत आहेत. आता आज दुपारी १२ वाजता या बाबत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये नाशिक आणि नागपूरसाठी महाविकास आघाडीचा पाठिंबा नेमका कोणाला असणार हे जाहीर करण्यात येणार आहे. नाशिक पदवीधर निवडणूकीत एकूण १६ उमेदवार आहेत. यात सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील आमनेसाने येत आहेत.

नागपूर शिक्षक मतदारसंघात एकूण २२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सुरूवातीला २७ उमेदवारांनी अर्ज भरला होता. नंतर यातील ५ जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तर आता नागपूरमध्ये सुधाकर अडबाले हे काँग्रेस उमेदवार असणार आहेत. नागपूरमध्ये कॉंग्रेस उमेदवार सुधाकर अडबाले यांना महावीकास आघाडीचा पाठिंबा असणार आहे. आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत नागपूरमध्ये सुधाकर अडबाले आणि नाशिकमध्ये शुभांगी पाटील यांचे नाव जाहीर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

आज महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यावर दोन ते तीन दिवसांत भाजप सत्यजीत तांबे यांना पाठिंबा जाहीर करू शकते.महाविकास आघाडीसाठी नाशिक आणि नागपूरमध्ये नेमकं कोण उमेदवार असणार या बाबात प्रश्न निर्माण झाला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com