Mahavikas Aghadi Vajramuth Sabha : आज मुंबईत महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा
Admin

Mahavikas Aghadi Vajramuth Sabha : आज मुंबईत महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा

महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज मुंबईत पार पडणार आहे.

महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज मुंबईत पार पडणार आहे. आजच्या या वज्रमूठ सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईत वांद्रे येथील बीकेसी (BKC) ग्राउंडवर महाविकास आघाडीची भव्य वज्रमूठ सभा पार पडणार आहे.

या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर नंतर आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची मुंबईत सभा होणार आहे. राज्यभरात महाविकास आघाडीकडून वज्रमूठ सभांचा धडाका सुरू आहे.

राज्यभरात महाविकास आघाडीच्या 16 सभा होणार आहेत. महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटाच्या सरकार विरोधात महाविकास आघाडीनं वज्रमूठ सभेला सुरुवात झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com