Kasba Bypoll Election : महाविकासआघाडीचे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे मतमोजणीच्या आधीच झळकले विजयाचे बॅनर
Admin

Kasba Bypoll Election : महाविकासआघाडीचे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे मतमोजणीच्या आधीच झळकले विजयाचे बॅनर

महाविकासआघाडीचे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे मतमोजणीच्या आधीच विजयाचे बॅनर झळकले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महाविकासआघाडीचे कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे मतमोजणीच्या आधीच विजयाचे बॅनर झळकले आहे. रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे बॅनर वडगावमध्ये लावण्यात आले आहेत. रवींद्र धंगेकर यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, असे बॅनरवर लिहिण्यात आले आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 50.06 टक्के मतदान झालं आहे. या मतदारसंघामध्ये एकूण 2,75,679 एवढे मतदार आहेत, कसब्यामधून भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर अशी लढत होती.

पुण्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये रविवारी मतदान पार पडलं आणि मतमोजणी ही गुरूवारी म्हणजेच 2 मार्चला होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com