Rahul Gandhi Tweet: राहुल गांधी यांच्या "त्या" वादग्रस्त पोस्टवर महायुतीच्या नेत्यांनी दिल्या प्रतिक्रिया; काय म्हणाले?

Rahul Gandhi Tweet: राहुल गांधी यांच्या "त्या" वादग्रस्त पोस्टवर महायुतीच्या नेत्यांनी दिल्या प्रतिक्रिया; काय म्हणाले?

राहुल गांधी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्टवर महायुतीच्या नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नितेश राणे यांनी काय म्हटले?
Published by :
Prachi Nate
Published on

आज १९ फेब्रुवारीला सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार सर्वत्र साजरी केली जात आहे. राज्यभरात सर्वांकडून महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा आणि सोहळे साजरी केले जात आहेत. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल गांधींच्या एक्स सोशल मीडियावरील पोस्टवरून मोठ्या वादाची शक्यता वर्तावली जात आहे.

राहुल गांधींच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. शिवजयंती दिनी अभिवादन करण्याऐवजी श्रद्धांजली वाहिल्याने राहुल गांधींच्या पोस्टवर राजकीय वर्तुळातून देखील टीकेची झोड करण्यात येत आहे. यादरम्यान आता राहुल गांधींनी केलेल्या पोस्टवर महायुतीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आलेल्या पाहायला मिळत आहे.

हे चुकून झालेलं नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

याचपार्श्वभूमिवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राहुल गांधी यांनी केलेल्या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तर आहेच. परंतू, तमाम देशातील आणि राज्यातील शिवभक्तांना देखील अपमान केलेला आहे. कारण ही सगळी वक्तव्य जाणीवपुर्वक होत असतात. हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान करण्याचा जाणीवपुर्वक हेतू आहे. सावरकरांचा अपमान करणारे आता यांची मजल छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत गेली. हे चुकून झालेलं नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या कृत्यावर त्यांनी माफी मागितली पाहिजे.

नेहमी आमच्या शिवरायांचा यांना द्वेष- नितेश राणे

त्याचसोबत पुढे नितेश राणे म्हणाले की, या औरंगजेबाच्या पिल्लावळीकडून आणखीन काही अपेक्षा नाही. हे हिरवे साप आहेत, औरंगजेबाच्या विचारावरती हे राजकारण करतात. नेहमी आमच्या शिवरायांचा यांना द्वेषच दिसणार. राहुल गांधींनी देशाची शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com