महायुतीचा महाशपथविधी सोहळा; आझाद मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

महायुतीचा महाशपथविधी सोहळा; आझाद मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • महायुती सरकारचा आज महाशपथविधी सोहळा

  • मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी

  • आझाद मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज 5 डिसेंबर 2024ला संध्याकाळी 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. या महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचे महानियोजन करण्यात आले आहे. भाजपकडून काल पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर महायुतीमधील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला.

आज शपथविधी सोहळा होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे, आझाद मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आझाद मैदानात कडेकोट बंदोबस्त कसा असणार?

5 हजार पोलीस आझाद मैदान परिसरात तैनात

2 दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोधक व नाशक पथकेही असणार

1 सह पोलीस आयुक्त, 3 अपर पोलीस आयुक्त, 6 पोलीस उपायुक्त

16 सहाय्यक पोलीस उपायुक्त, 600 पोलीस अधिकारी तैनात असणार

सर्व मान्यवरांच्या (व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी) आगमन मार्गांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त

मार्गांवर पोलीस अधिकारी, गृहरक्षक दल, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक तैनात असतील.

मार्गांवर वाहतूक पोलिसही असणार. त्यामध्ये सुमारे 144 वाहतूक पोलीस अधिकारी आणि 1 हजार पोलीस अंमलदारांचा समावेश असेल.

या मार्गांवर पोलीस अधिकारी, गृहरक्षक दल, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक तैनात असतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com